msaptpadi.com
सप्तपदी वधु वर सुचक केंद्र सुरु करण्याचा उद्देश असा की, मातंग समाज हा शैक्षणिक,
अर्थिकदृष्ट्या प्रगतशील होत आहे.पण स्वत:ची प्रगती करीत असताना सामाजिक प्रगतीही
होणे महत्वाचे असते, त्यासाठी स्त्री अथवा पुरुषाला एक योग्य जीवनसाथी मिळाला तर ती
प्रगती अधिक वेगाने होऊ शकते, तसेच तो जीवनसाथी स्वजातीय मिळाला तर त्यातुन सामाजिक
प्रगती होऊ शकते या हेतुने आम्ही सप्तपदी च्या माध्यमातुन मातंग समाजातील विवाह
ईच्छुक उमेदवारांची माहीती संकलीत करुन ती एकमेकांना देऊन त्यातुन विवाह घडवुन
आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. समाजबांधवांनी आपली अचुक व सत्य माहीती देऊन या
उपक्रमात भाग घेऊन स्वत:च्या व समाजाच्या प्रगतीचे प्रयत्न करावेत. सप्तपदी वधु वर
सुचक केंद्राने 15 ऑगस्ट 2010 रोजी सर्व प्रथम सांगली (सिंधीपुरुषार्थ हाँल) येथे
वधु वर परिचय मेळावा घेऊन या कार्याला सुरवात केली व महाराष्ट्रातील कोकण विभाग
वगळता 30 जिल्ह्यामधे परिचय मेळावा घेण्याचे सत्र सुरु केले. समाजामधे अधुनिक
सुविधा पुरवुन लोकांची कामे करणारी सप्तपदी ही पहिली संस्था आहे, ज्यामधे 2012
पासुन सर्व स्थळांची माहीती वेबसाईट वर देऊन संपुर्ण महाराष्ट्रातील विवाह ईच्छुक
वधु वरांना एकाच छताखाली आणले. 2011 पासुन पुणे येथे स्वतंत्र ऑफिस ची सोय केली.
2012 पासुन सर्व स्थळांची माहीती पुस्तकात (विशेषांक) छापुन समाजात एक नविन उपक्रम
सुरु केला व दरवर्षी हा सुरुच आहे. 2014-15 मधे एक वेगळा प्रयोग म्हणुन वधु वर CD
तयार केली. याशिवाय संपुर्ण महाराष्ट्रतील वधुवरांना एकाच ठिकाणी एकत्र येता यावे
म्हणुन 2014 पासुन पुण्यामधे राज्यस्तरीय मेळावे आयोजित करुन चहा, नाष्टा, जेवणासह
नियमीत राज्यस्तरीय मेळावे घेण्याचे सत्र सुरु केले. या ही पुढे जाऊन अधुनिकतेच्या
पुढच्या पायरीच्या आधारे प्रत्यक्ष मुलामुलीना त्यांच्या हातातील मोबाईल वर
स्थळांची माहीती घेता यावी म्हणुन 2019 पासुन अॅन्ड्रॉईड मोबाईल अॅप सुरु केले. या
सर्व गोष्टी सेवा फक्त आणि फक्त मातंग समाजासाठी देऊन समाजाच्या प्रगतीसाठी आम्ही
प्रयत्नशील आहोत.
संस्थापक श्री. प्रकाश मारुती साठे (Dip.Engg.) सप्तपदी वधु वर
सुचक केंद्र पुणे ( महाराष्ट्र )