msaptpadi.com
* नियम व अटी
१) सप्तपदी वधु वर सुचक केंद्रामध्ये नाव नोंदणी करणारा उमेदवार हा हिंदु - मातंग
किंवा ख्रिश्चन - मातंग जातीतीलच असावा.(इतर जाती धर्मातील लोकांनी आपली नाव नोंदणी
करु नये.) नाव नोंदणी करीत असताना मुलाचे वय २१ वर्ष पुर्ण व मुलीचे वय १८ वर्ष
पुर्ण असावे.
२)सप्तपदी वधु वर सुचक केंद्र हे फक्त मातंग समाजातील(जातीतील) विवाह ईच्छुक
मुला-मुलींची त्यांनी स्वत: किंवा त्यांच्या पालक, नातेवाईक यांनी दिलेली माहीती
सत्य मानुन ती इतरांना पुरवते व त्यातुन लग्न जमविण्याचे प्रयत्न केले जातात, तरी
प्रत्येकाने आपली संपुर्ण माहीती अचुक व सत्य द्यावी. माहीतीमध्ये प्रथम वर/वधु,
घटस्फोटीत, विधवा/विधुर, पुनर्विवाह असे नमुद करावे खोटी माहीती देऊ नये. माहीती
खोटी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
३) सप्तपदी वधु वर सुचक केंद्रा मध्ये वेबसाईट / अॅपव्दारे, प्रत्यक्ष अर्जाव्दारे
उमेदवाराने भरुन दिलेली माहीतीची सत्यता सप्तपदी वधु वर सुचक केंद्राने पडताळलेली
नसते. त्यामुळे ती माहीती खरी असेलच असे नाही, त्या माहीतीची प्रत्यक्ष खात्री करुन
आवश्यक ती कागदपत्रे, पुरावे तपासुनच लग्नाचा निर्णय घ्यावा. (खोट्या माहीतीमुळे
कोणाची फसवणुक झाल्यास सप्तपदी वधु वर सुचक केंद्र जबाबदार राहणार नाही.)
४) सप्तपदी वधु वर सुचक केंद्र हे उमेदवारानी दिलेली माहीती संकलीत करुन ती
एकमेकांना प्रसारीत करते. माहीती प्रसारणासाठी लागणारी यंत्रणा व त्यावरील खर्च हा
उमेदवाराकडुन समान शुल्क (फि) स्वरुपात आकारला जातो. उमेदवाराने शुल्क भरले म्हणजे
लग्न जमेलच असे नाही. लग्न जमण्यासाठी सप्तपदी वधु वर सुचक केंद्राकडे असणारी मातंग
समाजातील स्थळांची माहीती देण्याची जबाबदारी सप्तपदी वधु वर सुचक केंद्राची आहे
त्यातुन प्रत्येकाने लग्न जमवुन घेणे ही स्वजबाबदारी आहे. लग्न जमवुनच देण्याची
कसलीही जबाबदारी, खात्री सप्तपदी वधु वर सुचक केंद्र देत नाही.
५) सप्तपदी वधु वर सुचक केंद्रा कडे उमेदवारांनी दिलेले नोंदणी शुल्क ( फि)
कोणत्याही कारणास्तव परत दिले जाणार नाही. शुल्क जमा करण्यापूर्वीच सर्व नियम व अटी
मान्य करून सहकार्य करावे.
६) नोंदणी शुल्क जमा केल्यानंतर किमान १ तास ते ७२ तासांमधे पेड मेंबर म्हणून
प्रोफाईल ऑनलाईन साठी अॅक्टीव केले जाईल.
७)सभासदाकडुन कोणताही गैरप्रकार / गैरवर्तनुक निदर्शनास आल्यास त्याचक्षणी सभासदत्व
(मेंबरशीप) रद्द करुन खातेही बंद केले जाईल.
८) घटस्फोटीत / दुसरे लग्न , ख्रिश्चन स्थळांची संख्या जितकी सप्तपदी वधु वर सुचक
केंद्राच्या वेबसाईट/अप वर उपलब्ध असेल तितकीच पाहता येईल, त्यासाठी फी व स्थळांची
संख्या यांचा नियम लागु होणार नाही फक्त मुदतीचा नियम लागु राहील.
९) प्रत्येक प्लॅनची (मेंबरशीपची) मुदत संपल्यानंतर पेड मेंबरशीप आपोआप रद्द होईल,
त्याकालावधी मध्ये लग्न जमले नसेल तर नुतनीकरण करुन घ्यावे. नुतनीकरण नाही केलेतर
फ्री मेबरशीप सुरु राहील.
१०) अमर्यादीत (Unlimited) स्थळे म्हणजे सप्तपदी वधु वर सुचक केंद्रा कडे नोंदणी
केलेले जेवढी स्थळे असतील ती व प्लॅन च्या मुदतीपर्यंत जेवढे असतील तेवढी स्थळे.
११) उमेदवारांनी आपले लग्न (कोणत्याही माध्यमातुन) ठरले अथवा झाले असल्यास तसे
सप्तपदी वधु वर सुचक केंद्रा कडे कळवावे व आपले खाते बंद करुन टाकावे.
१२) सप्तपदी वधु वर सुचक केद्राकडुन लग्न ठरल्यानंतर कोणत्याही प्रकारची रक्कम
उमेदवाराकडुन मागीतली जात नाही. (उमेदवार स्वईच्छेने संस्थेस देणगी देऊ शकतात.)
१३) सप्तपदी वधु वर सुचक केद्रास जमा केलेल्या नोंदणी शुल्क, मेळावा शुल्क,
विशेषांक शुल्क, देणगी,वर्गणी व कोणत्याही अर्थिक व्यवहाराची रितसर पावती घ्यावी व
जपुन ठेवावी. ऑनलाईन व्यवहाराची पावती जपुन ठेवावी. वेळ प्रसंगी मागणीनुसार पावती
दाखवणे बंधनकारक
१४) सर्व हक्क सप्तपदी वधु वर सुचक केंद्राकडे राखीव
१५) सर्व न्यायालयीन प्रकरण पुणे न्यायालय अंतर्गत.